Thursday, October 15, 2026
Homeमुंबईआता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. - ग्रामीण...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागतात; सदरचा गंभीर मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह संजय देरकर आणि अतुल भोसले यांनी सभागृहात लावून धरला.यावर तोडगा काढतांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एक मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली. “इथून पुढे गावाच्या विकासासाठी आमदार फंड,डीपीसी किंवा २५-१५ योजनेतून कोणताही निधी हवा असल्यास, संबंधित गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला आधी द्यावा लागेल.गावात स्मशानभूमी असल्याशिवाय दुसरं कुठलंही काम मंजूर करता येणार नाही,” असा कडक जीआर (शासन निर्णय) शासनाने काढला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठीची जागा ग्रामपंचायतींकडे उपलब्ध नसली तरी वनविभागाच्या जमिनी आहेत, त्या द्याव्यात अशी मागणी समीर कुणावार यांनी केली. त्यावर, केंद्र सरकारच्या वनखात्याला पत्र लिहून तशी विनंती केली जाईल.केंद्रीय वनमंत्र्यांशी चर्चादेखील केली जाईल,असे आश्वासन मंत्री गोरे यांनी दिले.एका गावात स्मशानभूमीसाठी जागा नसेल; पण बाजूच्या गावात ती उपलब्ध असेल तर दोन गावांसाठी मिळून एक स्मशानभूमी उभारण्यावर विचार केला जाईल,असेही ते म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!