- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
बैठकीत हत्तीमुळे पिकांचे,घरांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.तसेच वन्यप्राणी रस्ता ओलांडतांना होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी किंवा मृत्यू झालेल्या नागरिकांना शासनाकडून कोणती मदत व भरपाई दिली जाते,याबाबत स्पष्ट धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय,सध्या गडचिरोली जिल्ह्यात हत्तींची नेमके लोकेशन,त्यांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण व नागरिकांना वेळेवर सूचना देण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात यावा,असे सुचविले.
जंगलालगत असलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सोलर ऊर्जा कुंपण,फेन्सिंग तार तसेच नैसर्गिक(निलगिरी)कुंपण उभारण्याची मागणी करण्यात आली.वघाळा परिसरात पक्षी संवर्धन व संरक्षणासाठी विशेष उपाययोजना राबविणे,तसेच कोरची तालुक्यातील टिपागड पर्यटन व विकास प्रकल्पाला गती देण्याची मागणीही आमदार मसराम यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील वन,वन्यजीव संवर्धन, शेतकरी संरक्षण आणि पर्यावरण विकासाशी संबंधित अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आमदार मसराम यांनी मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
- Advertisement -

