Saturday, October 10, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील 'त्या' मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर गर्भवतीने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना नुकतीच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध-कोहमारा मार्गावर घडली.
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ही दुसऱ्या बाळंतपणासाठी गोंदिया जिल्ह्याच्या  अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहेरी देवलगाव-नवेगावबांध येथे गेल्या होत्या.बाळंतपणाच्या वेदना सुरू होताच तिला शासकीय रुग्णालयात सोमवार ६ जुलै २०२६ रोजी भरती करण्यात आले होते.प्रसूती अतिजोखमीची असल्याने १०८ रुग्णवाहिका बोलावून तिला गोंदियाला रेफर करण्यात आले.परंतु नवेगावबांधची सीमा पार केल्यानंतर नवेगावबांध ते कोहमारा मार्गावर गर्भवतीला प्रसववेदना सुरू झाल्या. तीव्र वेदना जाणवू लागल्याने समयसूचकता बाळगून डॉ.ज्ञानेश्वर कापगते यांनी आशा कार्यकर्ती व रुग्णवाहिकेच्या चालकाच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी रुग्णवाहिका थांबवून सर्वांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती केली.गर्भवती मातेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.रुग्णवाहिकेत प्रसूती झाल्यानंतर बाळंतीण व नवजात बाळाला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करून त्वरित उपचार करण्यात आले.त्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र,तिथे योग्य उपचार न मिळाल्याने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात माता आणि बाळाला दाखल करण्यात आले.सध्या दोघेही सुखरूप आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!