Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजशिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास” या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा आणि सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीने जिद्द,चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी वाटचाल सुरु केली आहे.त्यानुसार, ‘विकसित भारत रोजगार व ग्रामीण आजीविका हमी’ योजने अंतर्गत आज,शुक्रवार १७ जुलै रोजी शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे,सामुहिक वन हक्क ग्रामसभा म्हणून विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील रोजगार कामाला सुरवात करणारी ही पहिली ग्रामसभा ठरली आहे.
शिवराजपूर ग्रामपंचायतीस अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता सुधारित अधिनियम २०१२ अंतर्गत २८९.४१ हे.आर.सामूहिक वनहक्क क्षेत्र प्राप्त झाले असून सामुहिक वन हक्क क्षेत्राच्या विकासासाठी ग्रामसभा प्रयत्नशील आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून सामुहिक वन हक्क क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यापासून ते त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत सातत्यमय अभ्यासात्मक प्रयत्न करून आज शुक्रवारी शिवाऱ्यादेव शिवराजपूर ते फरी रोड रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड कामाला सुरवात करण्यात आली.सदरचे
काम सतत तीन वर्षे चालणार असून सामाजिक वनीकरण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनात सुरु करण्यात आला आहे.वृक्ष संगोपन,संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी सामुहिक वन हक्क ग्रामसभा शिवराजपूरच्या ग्रामवासीय जनतेनी घेतली असून त्या दृष्टीने आम्ही नेहमी कार्यक्षम राहून भूमिका बजावू,या विश्वासाने कामाला सुरवात करण्यात आली आहे.प्रसंगी सामूहिक वन हक्क ग्रामसभा पदाधिकारी अध्यक्ष बाळकृष्ण आत्राम,सचिव बापूनाथ बेदरे, सदस्य अन्नाजी कुथे, राजेश्वर पिलारे,विद्या सूर्यवंशी,मंजुषा मेश्राम,अनंदाबाई हारगुडे,कविता कोडाप,भाग्यश्री कोडाप,सृष्टी संस्था ग्रामसभा मार्गदर्शक राकेश खेवले तथा गावातील मजूर वर्ग उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!