Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा रचून रंगेहात अटक केली.शिवरात्री संजय जाट वय ५९ वर्षे,विद्या सुनील जाट वय ४५ वर्षे व राजकुमारी धीरज जाट वय ३६ वर्षे तिघेही रा.बेलगाव केंजर मोहल्ला,जबलपूर,मध्य प्रदेश असे अटकेतील आरोपी महिलांची नावे असून या महिला नागपूरहून विदेशी दारू ट्रॅव्हल्सद्वारे आणून चंद्रपूर येथील प्रिन्स कैंजर रा.केंजर मोहल्ला,चंद्रपूर याला विक्रीसाठी देणार होत्या.या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून फरार आरोपी प्रिन्स केंजर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूर येथून चंद्रपुरात अवैध दारुची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.माहिती मिळताच पथकाने काल रविवारी वरोरा नाका चौकात सापळा रचला. दरम्यान,नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या एमएच ४९ एटी १६९६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सची पथकाने झडती घेतली. त्याचवेळेस ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या तीन महिलांच्या साहित्यांची तपासणी केली असता,त्यांच्या बॅगांमध्ये अवैधरित्या विदेशी दारू आढळून आली.जप्तीमध्ये ७५० मिलीच्या बॉम्बे व्हिस्कीच्या ८० बॉटल व १८० मिली क्षमतेच्या ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या शंभर सीलबंद बाटल्यांचा समावेश आहे.ज्याची किंमत ६१ हजार ८२० रुपये असून या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ)आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

कार चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कार चालकाचे स्टेअरिंगवरून अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कार थेट तिसऱ्या लेनमधील अज्ञात वाहनाला मागून धडकून झालेल्या...

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!