Tuesday, September 8, 2026
Homeचंद्रपूरसोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही. ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’,असे समजून हात झटकण्याचा प्रयत्न केला जातो आहे; पण म्हणतात ना एक दिवस ‘अती तिथे माती’ नक्कीच होणार आहे.अश्यातच लडाख येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ तथा समाजसेवक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज,सोमवार २० जुलै रोजी चंद्रपुरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले.त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हातात फलके घेऊन निदर्शने सुरू केली.याशिवाय,एकता संघर्ष समितीच्या वतीने काही विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे.सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.केंद्र सरकारने हे आंदोलन हुकूमशाही पद्धतीने हाताळल्याचा आरोप सर्वत्र केल्या जात आहे.त्यामुळे नीट पेपरफूटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,देशाच्या राजधानीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज चंद्रपुरात ‘लक्षवेध निदर्शनीय आंदोलन’ आयोजित करण्यात आला. सदरचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारच्या सुमारास सुरू झाले.आंदोलनाच्या माध्यमातून नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक शैक्षणिक धोरणांचा निषेध, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभावी उपाययोजना,तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!