Sunday, July 19, 2026
Homeदेसाईगंजनैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८ जुलै रोजी
शाळेतील दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन शिक्षण सभापती बाळकृष्ण माडुलवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.या कार्यक्रमाला आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते,नगरसेविका ज्योत्सना लुटे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे,सदस्य प्रदीप ठाकरे,पल्लवी बगमारे व अस्मिता पचारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
  • प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची निवड👇
विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही व निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा,या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक गोपनीय मतदान पद्धतीने घेण्यात आली.मतदान केंद्राची रचना,मतदारांची ओळख, मतदानपत्रिका,मतदान कक्ष,मतपेटी,मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे अशा सर्व टप्प्यांची शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली.
  • विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवड👇
१.कु.हुचिका कांबळे —मुख्यमंत्री
२.हिमांशू पचारे—गृहमंत्री
३.कुंज चांदेवर—अन्न व पोषण मंत्री
४.रौनक भुते—नियोजन मंत्री
५.चैतन्या ठाकरे—स्वच्छता मंत्री
६.प्रियांशी खरकाटे—पर्यावरण मंत्री
नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या, सोमवार २० जुलै २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता शालेय परिपाठात आयोजित करण्यात आला आहे.
  • निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव👇
शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगितले. “निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मौल्यवान अधिकार आणि महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे,”असे प्रतिपादन त्यांनी केले.तसेच शालेय मंत्रिमंडळातील प्रत्येक पदाची जबाबदारी,कर्तव्ये आणि अधिकार यांची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये PO-१ म्हणून तृशाली सुखदेवे,PO-२ म्हणून अपर्णा जडे,PO-३ म्हणून प्राची खरकाटे,तर BLO म्हणून प्रियांका तलमले व भारती प्रमोद राऊत यांनी आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मंगेश तुपट व ईश्वर गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध,निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने संपन्न झाली.उपस्थित मान्यवरांनी निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवत विद्यार्थ्यांच्या लोकशाहीविषयक जाणिवेचे विशेष कौतुक केले.
  • विद्यार्थिनीच्या मागण्यांना सभापतींचा सकारात्मक प्रतिसाद👇
नवनिर्वाचित मुख्यमंत्री हुचिका कांबळे हिने दोन डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण सभापतींचे विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले. यावेळी तिने शाळेसाठी वाय-फाय सुविधा,संगणक आणि सीसीटीव्ही साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
शिक्षण सभापती बाळकृष्ण माडुलवार यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत महिनाभराच्या आत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते आणि नगरसेविका ज्योत्सना लुटे यांनीही या आश्वासनाला दुजोरा दिला.मान्यवरांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
  • हुबेहूब व्यक्तिचित्र रांगोळीला रोख पारितोषिक👇
डिजिटल वर्गखोल्यांच्या उद्घाटनानिमित्त कु.दिव्या राऊत आणि भारती राऊत,सावंगी यांनी शिक्षण सभापती बाळकृष्ण माडुलवार यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र रांगोळीतून साकारले होते.आकर्षक रंगसंगती, कलात्मक मांडणी आणि चेहऱ्यावरील भावांचे अचूक चित्रण यामुळे ही रांगोळी कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
शिक्षण सभापती बाळकृष्ण माडुलवार यांनी या अप्रतिम कलाकृतीचे विशेष कौतुक केले.तसेच रांगोळी कलाकार दिव्या राऊत आणि भारती राऊत यांना प्रोत्साहन म्हणून रोख पारितोषिक देऊन गौरविले.त्यांच्या कलागुणांचे उपस्थित मान्यवर,शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांनीही भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मंगेश तुपट यांनी केले,तर ईश्वर गहाणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.शिक्षकवृंद,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!