Saturday, July 18, 2026
Homeनागपूररेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार १८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.अन्न आणि पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वेच्या धडकेत तब्बल सहा हरणांच्या कळपाचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वन विभाग,रेल्वेचे अधिकारी,कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी मृत हरणांचा रीतसर पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
हरीण नेमके कोणत्या जंगलातून शहराच्या हद्दीत
आणि रेल्वे रुळापर्यंत पोहोचले,याचा तपास सध्या
वन विभागाकडून केला जात आहे.विशेष म्हणजे,
कन्हान रेल्वे जंक्शनला लागूनच कांद्री-मनसर आणि कामठी वनपरिक्षेत्राचे झुडुपी व राखीव जंगल आहे. सदरचा परिसर रामटेक वनपरिक्षेत्र आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनला जोडलेला आहे.कन्हान नदीच्या खोऱ्यामुळे प्राण्यांना पाणी आणि अन्नासाठी हा एक नैसर्गिक मार्ग मिळतो.कामठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात येणाऱ्या या भागात झुडुपी जंगल असल्याने हरणांचा नेहमी वावर असतो.त्यातूनच रेल्वे रूळ ओलांडत असतांनाच हरणांचा कळप रेल्वेला धडकलेला असावा आणि सदरची घटना घडली असावी, असा कयास बांधला जातो आहे.याबाबत अधिकचा तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!