- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षकाला वाटेतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले.यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कामठी-इतवारी नागपूर मार्गावर घडली.नीलेश मुर्लीधर पारधी वय ४१ वर्षे,रा.रामकृष्ण लेआउट,येरखेडा,ता.कामठी,जि.नागपूर असे मृत शिक्षकाचे नाव असून,ते नागपूर शहरातील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकपदी कार्यरत होते.
नीलेश पारधी हे सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या एमएच-४० झेड-२९२२ क्रमांकाच्या दुचाकीने
स्वगावाहून नागपूर शहराच्या सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात होते.दरम्यान, कळमना परिसरात विरुद्ध दिशेने म्हणजेच नागपूरहून कामठीच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच ३१ एफसी-०९७१ क्रमांकाच्या नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसने धडक देत त्यांना दुचाकीसह फरफटत नेले.यात गंभीर दुखापत झाल्याने नीलेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर घटना घडताच चालकाने बस घटनास्थळीच सोडून पळ काढला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला.याप्रकरणी कळमना(नागपूर) पोलिसांनी बसचालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस)कलम २८१,१०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

