Saturday, July 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी यंदाच्या दिवाळीत मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.याचे कारण म्हणजे,राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या आर्थिक ताणामुळे मोफत साडी योजना बंद करण्यात आल्याचे वस्त्रोद्योग विभागाने स्पष्ट केले आहे.या संदर्भात वस्त्रोद्योग विभागाने १६ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२३ मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातल्या महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना सुरू केली होती.त्यानुसार,शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी दरवर्षी एक मोफत साडी मिळायची.गेल्या तीन वर्षात म्हणजेच २०२३,२०२४ व २०२५ मध्ये योजनेअंतर्गत महिलांना साड्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले होते. योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.मात्र, राज्यावरील वाढता आर्थिक बोजा आणि बदलत्या शासकीय प्राधान्यक्रमांमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे.या निर्णयामुळे चालू वर्षाच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दिवाळीत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना शासनाकडून मोफत साडी मिळणार नाही.याशिवाय, सर्वाधिक फटका स्थानिक यंत्रमाग क्षेत्राला बसणार आहे.विशेषतः महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळामार्फत विणकरांकडून या साड्यांची थेट खरेदी केली जात होती, ज्यामुळे हजारो विणकरांच्या हाताला काम मिळत होते. आता योजनाच बंद झाल्याने कुठली साडी अन् कुठले काम,अशी अवस्था निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले; गंभीर जखमी शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या  शिक्षकाला वाटेतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले.यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू...

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदची घोषणा.. – २४ तासासाठी आरोग्यसेवा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या कल्याण-डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉ.सृष्टी बाविस्कर आणि डॉ.वैभव साळुंखे यांना झालेल्या कथित मारहाणीनंतर देशभरातील डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य...

३५२ कलावंतांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम.. – देसाईगंज,गडचिरोली व अहेरी येथे होणार पडताळणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या "राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना" अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र कलावंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!