Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था “ना घर के ना घाट के” अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक असायचे. पण,आता वर्गात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बीएलओची मतदारयादी, एसआयआर,यू-डाएस प्लस,जनगणना,विविध सर्वेक्षण, शिष्यवृत्ती,पोषण आहाराचा हिशोब व इतर विविध जबाबदारीचे ओझे लादण्यात आल्याने शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते.तेही मनुष्य प्राणीच आहेत.डोक्याच्यावर पाणी गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार.एकीकडे मोठा गाजावाजा करून शाळा प्रवेशोत्सव करायचा आणि विद्यार्थी गुणवत्तेची बोंबाबोंब करून शिक्षणाचे ढोल पिटायचे.गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकाला वर्गात शिकवू तर द्या नं..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सध्या स्थितीत शिक्षक एकंदरीत शिकविण्यापेक्षा इतर कारकुनी कामात अडकले आहेत. अश्यातच सतत मोबाइलवर तात्काळ माहिती देण्याचा संदेश येतो,अनेकदा सर्व्हर डाऊन असतो,शाळेत नेटवर्क मिळत नाही.डेटा वेळेवर गेला नाही की गुणवत्ता ढासळली म्हणून जाब विचारला जातो.शिक्षकांना एसआयआरचे काम करण्यासाठी आधी सकाळी साडे आठ ते अडीच वाजे शाळांची वेळ करण्यात आली. आता १५ ते २९ जुलैदरम्यान सकाळी साडे सात ते साडे बारा वाजेची वेळ बदलली,मात्र शिक्षकाकडून बीएलओ कामे कमी न करता ‘जैसे थे’ ठेवले आहे.त्यामुळे केवळ शाळांची वेळ बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच,एसीच्या केबिनमध्ये बसून गुणवत्तेचे धोरण ठरवणाऱ्यांना मैदानावरचा शिक्षक किती तारेवरची कसरत करतोय हे दिसणार तरी कधी?असा विचार अनेक शिक्षकांच्या मनात घर करून सोडतो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!