उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै महिना अर्धा लोटून गेला तरीही मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात महिन्याकाठी मिळणारी दीड हजाराची रक्कम जमा झालेली नसल्याने जून आणि जुलै महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार की काय?असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता.अश्यातच आज,बुधवार १५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात केवळ जून महिन्याचेच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार,अनेक पात्र लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये जमा झाले असून जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार, याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे.दरम्यान,राज्यातील तब्बल ९० लाखाहून अधिकच्या महिला अपात्र ठरल्याने लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे.यात ई-केवायसी न करणारे,नावात गडबड,अडीच लाखापेक्षा अधिकचे उत्पन्न,आयकर भरणारे व पडताळणी अंती योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

