Friday, September 25, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी जुनी वडसा येथे एका विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.यात देसाईगंज नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती सचिन खरकाटे यांनी गावातील नागरिकांना वनहक्क कायद्यांतर्गत पट्टे मिळण्याच्या कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
याबाबत उपस्थितांना माहिती देतांना सभापती खरकाटे म्हणाले की,वन हक्क कायदा,२००६(एफआरए-२००६) नुसार,जर एखादी जमीन महसूल किंवा वन विभागाच्या अभिलेखात ‘झुडपी जंगल’ म्हणून नोंद असेल,तरीही त्यावर वन हक्क पट्टा मिळवता येतो. यासाठी १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून त्या जमिनीवर तुमचे वैयक्तिक किंवा सामूहिक अतिक्रमण(ताबा)असणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.यात दोन पट्टे मिळण्याचा मार्ग आहे. एक म्हणजे,वैयक्तिक वन हक्क पट्टा.यामध्ये वैयक्तिक शेती किंवा राहत्या घरासाठी.तर दुसरा म्हणजे सामूहिक वन हक्क पट्टा.यामध्ये संपूर्ण गावाला लागणारे जळण,चारा,डिंक,किंवा इतर गौण वनोपज गोळा करण्यासाठी.वनपट्टा मिळवायचा असेल तर सर्वात आधी ग्रामसभा घ्यावी लागते. ‘अ’ नमुना अर्ज भरून ग्रामसभेच्या ‘वन हक्क समिती’कडे सादर करावा लागतो.यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून जमिनीवर ताबा असल्याचे पुरावे (उदा.जुने दंड भरल्याच्या पावत्या,७/१२ उतारा,किंवा गावातील ज्येष्ठ नागरिकांचे जबाब).त्यानंतर,ग्रामसभेने मंजूर केलेला प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जातो व नंतर जिल्हास्तरीय समिती  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील अंतिम मंजुरी देऊन वन हक्काचे प्रमाणपत्र(पट्टा)वाटप करते.अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन सचिन खरकाटे यांनी उपस्थित नागरिकांना केले.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व सभापती सचिन खरकाटे यांचे आभार मानले.या सभेला पोलीस पाटील अविकांत बोदले,कोतवाल आशुतोष हेडाऊ,नगरसेविका लता मुळे,स्थानिक नागरिक,ज्येष्ठ नागरिक तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

‘पीएम-जनमन’ अंतर्गत तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार.. – योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे.प्रतिकूल कौटुंबिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!