Monday, September 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; बँकांचे कामकाज राहणार नियमित सुरू..

अखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; बँकांचे कामकाज राहणार नियमित सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील बँक कर्मचारी आज, सोमवार २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार होते.मात्र,संपाच्या पूर्वसंध्येला काल रविवारच्या रात्री इंडियन बँक्स असोसिएशन ((आयबीए)आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)यांच्यात बैठक झाली.बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा झाली.पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय बँक संघटना(आयबीए)आणि युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियन्स (यूएफबीयू)ची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्यात येणार आहे.सदरची समिती सर्व पर्यायांचा विचार करून संबंधित घटकांशी चर्चा करून ग्राहकांसह सर्वांना मान्य होईल,असा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.या बैठकीनंतर प्रस्तावित देशव्यापी बँक संप अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे,संप सुरू असता तर बँकांच्या सहामाही आर्थिक वर्षअखेरच्या कामकाजासह बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता होती.अश्यातच चर्चेअंती तोडगा निघाल्याने आजपासून बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!