Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा फाटल्याचे स्पष्ट होत आहे.कायद्याने दारूबंदी आहे; मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत असल्याचे पोलिसांच्या कार्यवाहीवरून दिसून येत आहे.परराज्य आणि शेजारील जिल्ह्यांतून दारूची मोठी खेप आणली जाते.जिल्ह्यात ठिकठिकाणी गावठी दारू गाळली जाते. पोलिस कारवाई करीत असले तरी दारू विक्रेते शिरजोर बनल्याचे दिसून येत असतांनाच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरात खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारु विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले असतांना काल गुरुवारच्या सायंकाळी देसाईगंजचे उपविभागिय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी कुख्यात दारु विक्रेती रजनी रामचंद्र आत्राम या महिलेला तब्बल एक वर्षासाठी चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर तडीपार (हद्दपार)करण्याचा आदेश दिल्याने दारु विक्रेत्यांसह अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गडचिरोली जिल्हा पोलिस अधिक्षक एम.रमेश
यांचे आदेशानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी कुरखेडा यांचे मार्फतीने देसाईगंज शहरातील गांधी वार्ड येथील रहिवासी रजनी आत्राम या महिलेविरुद्ध २०१९ पासून तब्बल १५ दारू विक्रिसह विविध गंभीर प्रकरणाची नोंद पोलीस रेकॉर्डला नमुद असुन या महिलेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच सामाजिक शांतता बाधित होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने सदर महिलेला तडीपार करावे,अश्या अभिप्रायाचा प्रस्ताव कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रसेनजित प्रधान यांचे न्यायासनास सादर करण्यात आला.न्यायासनाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी रजनी आत्राम हिला आपले म्हणणे सादर करण्याची संधी दिली होती.सदर महिलेने गुन्हे अमान्य केले असले तरी या महिलेने सन २००९ पासुन केलेल्या गुन्ह्यांचा सर्व लेखा-जोखा न्यायासनाचे कार्यालयात उपलब्ध होता.या महिलेला सन २०१३-१४ ला तत्कालीन उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी तडीपारीचा आदेश केला नसला,तरी सदर महिलेला या पुढे असे कृत्य करणार नसल्याचे हमीपत्र लिहुन ताकिद देत सोडले होते.सदर प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांचे न्यायासनासमोर रजनी आत्राम हिने ६ वर्षे पर्यंत कोणतेही गैर कायदेशिर कृत्य करणार नाही; असे लेखी हमीपत्र लिहुण दिलेले असतांनाही सदर महिलेवर कोणताच कायदेशिर धाक बसला नाही.त्यानंतरही सदर महिलेवर सतत गुन्ह्यांची नोंद होत राहिली.एवढेच नव्हे तर २०२३-२४ या कालावधीत सदर महिलेच्या घरी धाड टाकत असतांना ताफ्यासह आलेल्या महिला पोलिस उपनिरिक्षक सोनम नाईक यांचेवर हल्ला करुन जखमी केले.या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिल्याने सदर महिलेने उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले.या सर्व प्रकरणाची सखोल तपासणी करुन प्रसेनजित प्रधान यांचे न्यायासनाने सदर महिला ही अट्टल दारु विक्रेती असुन या महिलेला कायदा व सुव्यवस्थेशी देणे-घेणे नाही.सदर महिलेमुळे सामाजिक सलोखा बिघडुन युवा पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे आढळुन येत असल्याने सदर महिलेला २४ तासाचे आत गडचिरोली,गोंदिया,भंडारा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांच्या जिल्हा सिमाबाहेर तब्बल एक वर्षासाठी तडीपार करण्यात येत असुन ती ज्या जिल्हा सिमे बाहेर वास्तव्यास असेल त्या पोलिस स्टेशनला हजेरी देत एक वर्ष चार जिल्ह्यातुन सिमा बंदीचे आदेश पारित केले.
  • दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश👇
१.रजनी रामचंद्र आत्राम रा.गांधी वार्ड,देसाईगंज ता. देसाईगंज हिला या आदेशाच्या दिनांकापासून एक (१)वर्षाचे कालावधीसाठी संपूर्ण गडचिरोली,भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूली सीमेतून हद्दपार (तडीपार)करण्यात येत आहे.
२.रजनी आत्राम यांनी हा आदेश प्राप्त झाल्यापासून २४ तासाच्या आत संपूर्ण गडचिरोली,भंडारा,गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूली सीमेबाहेर निघून जावे.
३.हद्दपारीच्या १ वर्षाचे कालावधीत रजनी आत्राम
यांनी या प्राधिकरणाच्या(किंवा सक्षम न्यायालयाच्या) पूर्वपरवानगीशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करु नये.
४.जर रजनी आत्राम यांनी या आदेशाचे उल्लंघन करुन गडचिरोली,भंडारा,गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला तर त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १४२ नुसार अटक करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
५.गैरअर्जदार यांनी हद्दपारीच्या काळात ते ज्या जिल्ह्यात/ठिकाणी वास्तव्य करणार आहेत.त्या स्थानिक पोलीस स्टेशनला आपल्या उपस्थितांची नोंद सक्तीने द्यावी.
सदरच्या कारवाईने देसाईगंज परिसरातील अट्टल गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.विशेष म्हणजे, आणखी काही अट्टल गुन्हेगारांचा लेखाजोखा तयार करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!