Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९०...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच देसाईगंज पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२५-२६ या कालावधीत पोलिस प्रशासनाने धाडी टाकून १८५ गुन्ह्याच्या नोंदितुन १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा जप्त केला.यात ९० मिली मापाच्या १२ हजार ५२६ टिल्लु देशी दारु,१८० मिली मापाच्या १३३ नग, ७५० मिलीच्या २ नग,५०० मिलीच्या १७  संत्रा कंपनीच्या ५३३ नग देशी दारु असा एकुण १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा हस्तगत केलेला दारुसाठा आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरिक्षक एम.एम.परांडकर,देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन सरपे,मिनाक्षी तोडासे,निलेश कढव,सुनिल मडावी,शैलेश तोरपकवार यांचे उपस्थितित नष्ट करण्यात आला.सदरची कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी मडामे यांचे आदेशानुसार देसाईगंजचे पोलिस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!