Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीकर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. - गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून,त्यांनी विलंब न करता ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
राज्य शासनाने २ जून व १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ शेतकरी पात्र ठरले होते, तर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत. दरम्यान,योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकूण ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी २ लाख ५० हजार ३९५ रुपये जमा करण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम यांनी कळवले आहे.
  • दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी👇
योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले,३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले अल्पमुदत पीककर्ज विचारात घेतले जाणार आहे.पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील एकत्रित थकीत मुद्दल व व्याजाच्या रकमेवर प्रतिशेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
  • नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन👇
सन २०२३-२४ अथवा २०२४-२५ या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे अथवा पूर्णतः परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या पात्र कर्जाच्या रकमेनुसार प्रतिशेतकरी कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
  • दुसऱ्या टप्प्याची यादी प्राप्त; गावपातळीवर प्रसिद्ध👇
दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाकडून ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.या यादीमध्ये जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकऱ्यांचा समावेश आहे.ही यादी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय,संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व संबंधित बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्जमुक्तीबाबत संदेशही पाठविण्यात आला आहे.तथापि,मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नसला तरी शेतकऱ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र यादीत आपले नाव तपासावे आणि नाव असल्यास आवश्यक प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
  • ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य👇
कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
प्रमाणीकरण करतांना अथवा कर्ज खात्याच्या माहितीत काही अडचण आल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी किंवा सहकार विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
कर्जमाफीची रक्कम निश्चित करतांना शासनाने बँकांसाठी निर्धारित केलेल्या विहित पद्धतीनुसार थकीत कर्जाची तारीख आणि कालावधी विचारात घेऊन बँकांना देय असलेली रक्कम निश्चित केली जाणार आहे.शासनाच्या निर्धारित निकषांनुसार ही प्रक्रिया संबंधित बँकांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहू नये,यासाठी दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांनी पात्र यादीत आपले नाव तपासून आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे.काही अडचण असल्यास संबंधित बँक शाखा किंवा सहकार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,गडचिरोली मुकुंद मेश्राम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!