- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.चक्क सासऱ्याने स्वतःच्याच सूनेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केली व स्वतःही विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र,नागरिकांनी त्याला तात्काळ विहिरीतून बाहेर काढल्याने तो थोडक्यात बचावला.पण,त्याची प्रकृती गंभीर आहे.लक्ष्मी रविशंकर पाली वय ४२ वर्षे असे मृतक महिलेचे नाव आहे; तर नत्थुमल भगवान पाली वय ६८ वर्षे असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे.
मृतक लक्ष्मी यांना दोन मुले आहेत.लक्ष्मीचे पती रविशंकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले.लक्ष्मी मुलांसह सासऱ्यापासून वेगळ्या खोलीत राहत होती.मात्र, सासऱ्याला सूनेवर संशय होता की,मुलावर जादुटोणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा.याच संशयावरून सून आणि सासऱ्यात नेहमी भांडण व्हायचे.अश्याच प्रकारे काल शुक्रवारच्या रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.त्यात शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र,आज शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.वाद विकोपाला गेला आणि नत्थुमलने रागाच्या भरात जवळील कुऱ्हाडीने लक्ष्मीच्या डोक्यात प्रहार केला.यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला.त्याचवेळेस घाबरलेल्या नत्थुमलने विहिरीत उडी मारली.दरम्यान,नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.यशोधरानगर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.त्यांच्या मदतीने नत्थुमलला विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,फुफ्फुसात पाणी शिरल्याने त्याची प्रकृती गंभीर असून यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला.पुढील तपास यशोधरानगर पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

