Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली: पोलीस नक्षल चकमक; चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान…-चकमकीत सी-६० पथकाचा एक पीएसआय...

गडचिरोली: पोलीस नक्षल चकमक; चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान…-चकमकीत सी-६० पथकाचा एक पीएसआय आणि एक जवान जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे ५ तासांपासून अधिक काळ चकमक झाली आहे.यात एका उपनिरीक्षकासह दोन जवान जखमी झाले आहेत.त्यांना एअर लिफ्टने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सैनिकांच्या मदतीसाठी बॅकअप फोर्सही पाठवण्यात आला आहे.  गडचिरोली पोलिसांनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

सी-६० पथक आणि माओवाद्यांत दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ६ तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. परिसरात केलेल्या शोधामुळे आतापर्यंत १२ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.आतापर्यंत ३ एके-४७,२ आयसीएनएसएएस,१ कार्बाइन,१ एसएलआर यासह ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जखमी उपनिरीक्षक सतीश पाटील हे महाराष्ट्राच्या सी -६० दलाचे शिपाई आहेत.त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली.कांकेर येथील बांदा येथून त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कांकेर आणि गडचिरोलीच्या जंगलात ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.महाराष्ट्र पोलिस आणि सी-६० चे जवान गडचिरोली येथून शोधासाठी गेले होते.दरम्यान,दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान झारवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक झाली.सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

डीव्हीसीएम लक्ष्मण आत्राम,विशाल आत्राम यांचा मृतक माओवाद्यांमध्ये समावेश असून त्यांची ओळख पटली आहे.माओवाद्यांची ओळख आणि परिसरात शोध सुरू आहे.या चकमकीत सी-६० पथकाचा एक पीएसआय आणि एक जवान गोळीबारात जखमी झाला आहे.ते धोक्याबाहेर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये असताना त्या ठिकाणी एसपी आणि आयजी यांनी या चकमक मोहिमेची माहिती दिली होती.रात्री उशीरापर्यंत सुमारे जवळपास १२ माओवाद्यांना मारले आहे.अलीकडच्या काळातील हे सगळ्यात मोठे ऑपरेशन आहे. गडचिरोली पोलिसांचे मी अभिनंदन करतो,त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ५१ लाखांचे बक्षीसही दिले जाईल; अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा...

मोबाइलचा अतिवापर; अभ्यासाकडे दुर्लक्ष.. -पालकांनी मोबाइल काढून घेताच तरुणीने सोडले घर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोफत इंटरनेट,त्यातच फोनवरील अमर्यादित संभाषणे आणि रिल्समुळे दिवस कसा काय निघून जातो; हे अनेकांना कळतच नाही.एकदा कां मोबाईलची सवय जडली,तर ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!