Sunday, August 9, 2026
Homeगोंदियाबहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. - ५० हजाराची दिली सुपारी..

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने साळा नीरज तुलसीकुमार बन्सोड वय २८ वर्षे,रा. खुर्शीपारटोला,ता.आमगाव,जि.गोंदिया व मध्य प्रदेश राज्यातील नैनपूर येथील त्याचा मित्र रोहित ऊर्फ आयुष नहार बंशकार वय १९ वर्षे,रा.बसोडी मोहल्ला, नैनपुर, निशांत मंगल बंशकार वय १९ वर्षे,रा.बसोडी मोहल्ला, नैनपूर व राहुल मिश्रा नंदा वय ३२ वर्षे,रा. कनोजियाटोला,नैनपूर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.तर अनमोल ऊर्फ शंभू वसंत रंगारी वय ४० वर्षे,रा.भद्रुटोला,कारंजा,ता. जि.गोंदिया असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे.
  • प्रकरण काय?👇
गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा गाव परिसरातील पतंगा चौक ते पोलिस मुख्यालय बायपास मार्गावरील किसान चौकाजवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार २३ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास अनमोल रंगारी यांचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर तसेच चेहऱ्यावर गंभीर वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.त्यानुसार, कारंजा येथील ५८ वर्षीय कपूरचंद मनीराम रंगारी यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. महत्वाचे म्हणजे,अनमोल रंगारी सोमवार,२२ जूनच्या रात्री सुमारे ९ वाजता दुचाकीने घराबाहेर गेला पडला होता.मात्र,तो रात्रभर परतला नाही आणि मंगळवार २३ जून रोजी मृतदेह आढळून आला होता.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोन पथक तयार करुन तपास सुरू केला.दरम्यान, पथकास गोपनीय माहिती मिळाली की,अनमोलचा त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू असून बहीण आणि साळा नीरज बन्सोड यांनी मिळून पोलिसांत तक्रार दिली असल्याने त्याची चौकशी करून पहा.त्यावरून, पोलिसांनी खुर्शीपारटोला येथून नीरज बन्सोडला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या मित्रासोबत अनमोलची हत्या केल्याचे सांगितले.बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून नीरजने शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील नैनपूर येथील त्याचा मित्र रोहित ऊर्फ आयुष नहार बंशकार  याला जावई अनमोल याला ठार मारण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती.ठरल्याप्रमाणे सोमवार २२ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान रोहित बंशकार हा बसने निशांत मंगल बंशकार व राहुल मिश्रा नंदा यांच्यासोबत गोंदियात आला होता.गोंदियात येताच रोहित बंशकार याने माझे मित्र आले असून त्याला सोबत घेऊन ये,असे म्हटले.त्यानुसार,त्यांच्यासोबत दारू पिण्यासाठी नीरज हा जावई अनमोल यालाही घटनास्थळी घेऊन गेला.तेथे दारू पिऊन अनमोलच्या डोक्यावर सब्बलने(खंती)वार करून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेले.अनमोल हा व्यवसायाने ॲम्ब्युलन्स चालक होता.तसेच खासगी वाहन देखील चालवत होता.तो विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.अनमोलच्या हत्येने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!