Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरआता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित ‘धडाकेबाज’ अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत. याबाबत राज्याच्या गृहविभागाकडून काल,मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आदेश जारी करण्यात आला.यापूर्वी नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.डॉ.सिंगल यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये नागपूर पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती.विशेष म्हणजे,ड्रग्स,गांजा व हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याने नागपुरात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.त्यातही,राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचेच असल्याने बदल गरजेचे होते.त्यानुसार,अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे; तर डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

  • विश्वास नांगरे पाटील यांची कारकीर्द👇
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान जिवाची पर्वा न करता ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी शिरले होते.या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकानेदेखील सन्मानित करण्यात आले होते.मुंबईत त्यांनी झोन-१ च्या उपायुक्त पदासोबतच अप्पर पोलिस आयुक्त(पश्चिम विभाग,मुंबई), सहपोलिस आयुक्त इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडल्या. यासोबतच लातूर,अहमदनगर,पुणे (ग्रामीण),ठाणे(ग्रामीण)येथील अधीक्षक,औरंगाबाद व कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक,नाशिकचे पोलिस आयुक्त पदाचादेखील त्यांना अनुभव आहे. २००७ मध्ये पुणे व २००८ तसेच २०१२ मध्ये जुहूमधील रेव्ह पार्टीचादेखील त्यांच्या नेतृत्वातच भांडाफोड झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!