- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदी पुलावरून एका इसमाने नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना आज,मंगळवार १५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मार्गावरून आवागमन करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच बघ्यांनी मोठी गर्दी करून घटनेची माहिती तात्काळ देसाईगंज पोलिसांना दिली.दरम्यान, देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गोडबोले पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर,काही वेळातच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता नदीत उडी घेणारा इसम पाण्याच्या प्रवाहात वाहून जात क्षणातच दिसेनासा झाला.विशेष म्हणजे,उडी घेणाऱ्या इसमाच्या पायातील चप्पल नदी पुलावर आढळून आली आहे.इसमाने पुलावरून उडी मारतच काही नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असतांनाचा व्हिडिओ चित्रीकरणही केला आहे.त्यात एक इसम वाहून जातांना दिसत आहे.अद्याप इसमाचा शोध लागलेला नसून पोलिसांकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
- Advertisement -

