Wednesday, September 16, 2026
Homeदेसाईगंजअखेर अपघातात जखमी झालेल्या देसाईगंज येथील पत्रकाराचा उपचारादरम्यान मृत्यू…-ट्रक आणि कारचा झाला...

अखेर अपघातात जखमी झालेल्या देसाईगंज येथील पत्रकाराचा उपचारादरम्यान मृत्यू…-ट्रक आणि कारचा झाला होता भीषण अपघात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-नागपूरहून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन जण ठार,तर तिघेजण जखमी झाले असल्याची घटना,मागील आठवड्याच्या बुधवारी,दिनांक-१० जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ घडली होती.सदर झालेल्या अपघातात दिलीप परसवाणी वय ५५ वर्षे व महेक जितेंद्र परसवाणी वय ४२ वर्षे,दोघेही रा.देसाईगंज,जि. गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला होता.झालेल्या अपघातात जितेंद्र(जितू)परसवाणी वय ४५ वर्षे आणि त्यांची दोन मुले गौरव परसवाणी वय १७ वर्षे व उदय परसवाणी वय १० वर्षे हे गंभीर जखमी झाले होते.

जखमी झालेल्या तिघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र,जितेंद्र(जितू) परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून नागपूरच्या खाजगी रुग्णालयात जितेंद्र परसवाणी यांच्यावर उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना काल,बुधवारच्या रात्री १७ जुलै ला त्यांची प्रकृती खालावली व अखेर परसवाणी यांची प्राणज्योत मावळली.

जितेंद्र परसवाणी हे देसाईगंज येथील ‘देसाईगंज समाचार’ साप्ताहिक पेपरचे संचालक तसेच देसाईगंज समाचार पोर्टलचे मालक होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा...

मोबाइलचा अतिवापर; अभ्यासाकडे दुर्लक्ष.. -पालकांनी मोबाइल काढून घेताच तरुणीने सोडले घर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोफत इंटरनेट,त्यातच फोनवरील अमर्यादित संभाषणे आणि रिल्समुळे दिवस कसा काय निघून जातो; हे अनेकांना कळतच नाही.एकदा कां मोबाईलची सवय जडली,तर ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!