Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरमजनुगिरी अंगलट..! अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून इच्छेविरुद्ध प्रेम प्रगट.. - आरोपीस अटक;...

मजनुगिरी अंगलट..! अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून इच्छेविरुद्ध प्रेम प्रगट.. – आरोपीस अटक; गावकऱ्यांमध्ये संताप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून तिच्या इच्छेविरुद्ध प्रेम प्रगट करणाऱ्या २१ वर्षीय तरुणास मजनुगिरी अंगलट आल्याची घटना काल,बुधवारी २६ मार्च रोजी उघडकीस आली.आरोपी तरुणाच्या त्रासापायी मुलीने कुटुंबीयांना आपबिती सांगितल्याने पोलिसांत तक्रार दाखल करताच नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणास अटक केली आहे.सदरची घटना गावकऱ्यांच्या कानावर पडताच घटनेबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रितेश अविनाश पानसे वय २१ वर्षे असे आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी रितेश  पानसे हा अल्पवयीन मुलीच्या मागे लागून ‘मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो,’ माझे प्रेम मान्य कर’ यासाठी तो मुलीचा पिच्छा सोडत नव्हता.त्यातच आरोपीने सोमवारी कीपॅड मोबाइल हातात देऊन होकारासाठी दबाव टाकला.मुलीने अनेकदा त्याला प्रतिकार तसेच टाळण्याचा प्रयत्न केला.मात्र,आरोपी मुलीचा पिच्छाच सोडत नसल्याने तिने याबाबत घरच्यांना सांगितले. घरच्यांनी लगेच नागभीड पोलीस ठाणे गाठून रितेश पानसे विरुद्ध तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी २५ मार्चच्या रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुराधा फुकट करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!