- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,शुक्रवार १ मे रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरातील फेज-१,बिल्डिंग क्रमांक-१,मधील फ्लॅट क्रमांक-१ मध्ये उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. संगीता श्रीराम ढबाले वय ५२ वर्षे व त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रम्हे वय २९ वर्षे, रा.ओमनगर, सक्करदरा,नागपूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वी आकांक्षा हिला बाळ झाले होते.मात्र, जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला होता.त्या धक्क्यातून सावरण्यासाठी ती आईकडे राहायला गेली होती. अश्यातच आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास आकांक्षाचे पती लोकेश सुधाकर ब्रम्हे वय ३० वर्षे हे घरी गेले असता समोरील दार आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले.पाहताच दोघीही मायलेकी घरातील एका लोखंडी रॉडला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकतांना दिसून आल्या.त्यांनी तात्काळ शेजारी व नातेवाईकांना बोलावले.शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आकांक्षाला खाली उतरवले.त्यानंतर नंदनवन पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह खाली उतरवून पुढील तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले.या प्रकरणी आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून बाळाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून वा कौटुंबिक वादंगामुळे दोघींनीही टोकाचा निर्णय घेतला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान,नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.प्राथमिक तपासात एक सुसाईड नोट सापडली असून सुसाईड नोटमधील मजकुरावरून पोलिसांना जावई लोकेश ब्रम्हे याच्यावरच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय आहे.
- Advertisement -

