Friday, May 1, 2026
Homeनागपूरमोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या अनेक घटना गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात प्रवाशांना अनुभवायला मिळाल्या आहेत. अश्यातच आता आज,शुक्रवार १ मे रोजी चक्क धावत्या बसचे चाकच निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने बस चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ जरी टळला असला तरीही एसटी बसच्या देखभालीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.सदरची घटना साकोली आगाराच्या एक किलोमीटर आधीच सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.आज सकाळच्या सुमारास नागपूर येथील गणेशपेठ आगाराची एमएच ०६ बीडब्ल्यू ०८११ क्रमांकाची बस नागपूरहून देवरीकडे निघाली होती.यात बस चालक निखिल तांबेकर तर वाहक म्हणून स्वीटी निखाडे आणि एकूण ३६ प्रवासी प्रवास करीत होते.प्रवास सुरू असतांनाच धावती बस साकोली आगाराच्या जवळ जाण्यापूर्वीच बसच्या मागच्या डाव्या बाजूचे चाक अचानकपणे निघाले.दरम्यान,बसला काहीतरी झाल्याचे लक्षात येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत बसचा ब्रेक मारून बस रस्त्याच्या कडेला थांबविली.पाहतात तर बसचे चाक बाहेर निघून दूर जाऊन पडलेले दिसून आले.तत्पूर्वी धावत्या बसचे अचानकपणे संतुलन बिघडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.सदरचा प्रकार लक्षात येताच चालक आणि वाहक यांनी तात्काळ प्रवाशांना बाहेर काढून मदतकार्यासाठी वरिष्ठांना पाचारण केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!