Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजजन सुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी.. ...

जन सुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी.. -वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                       

देसाईगंज(गडचिरोली):-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक पारित केले.हे विधेयक जनसुरक्षेच्या नावाखाली जनतेचे हक्क हिरावून घेणारे असल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी प्रखर विरोध दर्शविला असुन संपुर्ण महाराष्ट्रात या विधेयकाच्या विरोधात एलगार पुकारला आहे.त्याच धर्तिवर देसाईगंज तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीने आज,मंगळवार २२ जुलै रोजी देसाईगंजच्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाच्या मार्फतिने महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सदरचे विधेयक रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
वंचित बहुजन आघाडीने म्हटले की,महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेले जनसुरक्षा विधेयकाच्या तरतुदित प्रतिबंधित संघटनांच्या माध्यमातुन मोर्चे,निदर्शने आंदोलने उभारण्यास बंदी, शासनाच्या विरोधात वक्तव्य करण्यावर बंदी, शासकिय धोरणांच्या विरोधात मोर्चे काढणे,आंदोलन उभारण्यावर बंदी अश्या जाचक तरतुदींचा समावेश केल्याने नागरिक,विद्यार्थी, पेन्शनधारक सरकारच्या विरोधात निदर्शने देऊ शकत नाही.असे आढळल्यास त्यांचेवर शहरी नक्षलवाद, मोक्का,ताडा अश्या गुन्ह्याची नोंद करण्याची तरतुद असल्याने संविधानाने बहाल केलेल्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावुन घेण्याची दाट शक्यता असल्याने सदर विधेयक रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी देसाईगंजच्या प्रभारी उपविभागिय अधिकारी तथा तहसिलदार प्रिती डूडुलकर यांच्या मार्फतिने महाराष्ट्राचे राज्यपाल तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनात नमुद केले.या प्रसंगी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमराव शेन्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रद्न्या निमगडे,तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,शहराध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम,तालुका उपाध्यक्ष शिशुपाल वालदे, सचिव राकेश शेन्डे,नानाजी कऱ्हाडे,अभिमन्यू बन्सोड, प्रमोद मेश्राम,दिलिप बन्सोड,संजय ठवरे,उद्धवराव खोब्रागडे,मनोज घायवान,हुपचंद भैसारे,लक्षमन नागदेवते,प्रमोद नांदगावे,सविता भैसारे,निमा बागडे,ज्योती दहिकर, कविता निरंजने,पोर्णिमा गणविर,लता बारसागडे, राजेन्द्र बारसागडे,रोहित जनबंधू,पप्पु खान,दिवाकर बारसागडे, प्रकाश बारसागडे,भाष्कर मेश्राम यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
  • निवेदन सादर करतांनाचा व्हिडिओ 👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!