Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह माजी आमदार गजबे यांचा वाढदिवस साजरा.. -वाढदिवसानिमित्त...

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह माजी आमदार गजबे यांचा वाढदिवस साजरा.. -वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना विविध सहित्यांसह फळांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, कृष्णा गजबे यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी देसाईगंजच्या वतीने आज,मंगळवार २२ जुलै रोजी देसाईगंज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या निमित्ताने पार्वती निवासी मतिमंद विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांना विविध सहित्यांसह फळांचे वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे,तर काल सोमवारी कृष्णा गजबे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आज भाजपातर्फे संयुक्त वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी आरमोरी विधानसभेचे माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, “आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे,कारण आज आपण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलो आहोत.सर्वात आधी मी मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वाढदिवस हा केवळ केक कापून साजरा करण्याचा दिवस नसून,तो समाजसेवेसाठी आणि गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी एक संधी आहे.आज आपण पार्वती निवासी मतिमंद विद्यालयातील या निरागस मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहोत, त्यांना शालेय साहित्य आणि फळे वाटप करत आहोत.हा उपक्रम मला विशेष समाधान देतो.मुख्यमंत्री महोदयांनी नेहमीच समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्य केले आहे.त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळेच महाराष्ट्र प्रगतीपथावर अग्रेसर आहे.गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी या भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत,ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. याचबरोबर,आरमोरी मतदारसंघाचा आमदार म्हणून मलाही आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली.आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासानेच मी हे कार्य करू शकलो.शिक्षण,आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिक यांचे मी मनापासून आभार मानतो.आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम यशस्वी केले.आपल्या एकजुटीतूनच आपण समाजाला अधिक चांगले आणि मजबूत बनवू शकतो.पुन्हा एकदा मुख्यमंत्री  महोदयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वांनी असेच एकत्र येऊन समाजसेवेचे कार्य करत राहावे,अशी अपेक्षा व्यक्त करतो.” असे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संबोधित केले.
आज मंगळवारी पार पडलेल्या कार्यक्रमास लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठाणी,उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल,नरेश विटानी,जिल्हा सचिव सचिन वानखेडे,ज्योतू तेलतूमडे,तालुका शहराध्यक्ष सचिन खरकाटे,माजी नगरसेविका हेमा कावळे,शहर महामंत्री कुलदीप आमले,चोपणदास विधाते,वर्षा राऊत,संदीप राऊत,कोडापे ताई,बादल रहाटे,संगम शेंडे,अमन रामटेके,दयाराम बुराडे,आदित्य रहाटे,प्रभात चाहांदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!