Saturday, September 5, 2026
Homeकुरखेडाआंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार...

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट ग्रामपंचायत आंधळी-नवरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज,मंगळवार २१ जुलै रोजी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे मोफत नेत्र तपासणी,चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडला.शिबिरात एकूण ११७ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.तर तपासणीनंतर ३२ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर महात्मे आय बँक हॉस्पिटल,नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया व पुढील उपचार करण्यात येणार आहेत.याशिवाय ७७ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपप्रशासक तथा माजी उपसरपंच अप्रव भैसारे,वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वरी सिन्हा,डॉ.अरविंद डोंगरवार,माजी ग्रामपंचायत सदस्य नानाजी खुणे,मीनाक्षी डोंगरे तसेच सीएचओ वानखेडे उपस्थित होत्या.
शिबिराच्या यशस्वितेसाठी महात्मे हॉस्पिटलचे आयुष गायकवाड,निशा कुमारी,संकेत शेंभरकर,अविनाश आडे,आशा सेविका कोकिता सयाम,वैशाली पंधरे, रत्ना नैताम,ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम उईके, शिपाई माधुरी सयाम आणि गुलशन सयाम यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक सुरेंद्र गौतम यांनी केले,तर मंदा वारके यांनी आभार मानले. शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत नेत्र तपासणी,चष्मे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळाल्याने ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!