Friday, July 17, 2026
Homeकुरखेडामहामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. -...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.या समस्येकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा महासचिव रविंद्र गोटेफोडे यांनी तातडीने चेंबर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
२२ मीटर रुंदीच्या महामार्गाच्या कामामुळे पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले सार्वजनिक नळयोजनेचे तीन खोल चेंबर आता महामार्गाच्या मध्यभागी आले आहेत.सध्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असल्याने चेंबरवरील लोखंडी पत्रे तुटून वाहने खड्ड्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वीच संबंधित चेंबर सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक होते.मात्र,तसे न करता बांधकाम सुरू करण्यात आल्याने अपघाताबरोबरच शहराच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चेंबरचे स्थलांतर होईपर्यंत त्या भागातून वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचे नियोजन करावे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी रविंद्र गोटेफोडे यांनी महामार्ग विभागाकडे केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!