Thursday, September 3, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा : दुकानात काम करणारा मदतनीसच निघाला चोर.. - ३ लाखांची रोकड...

कुरखेडा : दुकानात काम करणारा मदतनीसच निघाला चोर.. – ३ लाखांची रोकड प्रकरणी तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह एका आरोपीला अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-दोन दिवसांपूर्वी कुरखेडा शहराच्या एका जनरल स्टोर्समध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातून ३ लाखाची रोकड लंपास केल्या प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी दुकानात काम करणाऱ्या एका मदतनीस बालकासह अन्य तिघांना अटक करीत मुद्देमाल जप्त केला आहे.
कुरखेडा शहरातील जनरल स्टोर्सचे संचालक साहील हिरालाल वरलानी यांचे शहरातील मुख्य मार्गावर किराणा व इतर सामानांचे होलसेलचे दुकान आहे.दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याप्रकरणी त्यांनी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे  तक्रार दाखल केली होती.तक्रारीत दुकानातील ३ लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले.त्यानुसार कुरखेडा पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला.अशातच दुकानात काम करणारा मदतनीस बालक याच्या वर्तवणुकीत बदल दिसून येऊ लागल्याने शंका बळावली.त्यानुसार पोलिसांनी काम करणाऱ्या मदतनीसाची झडती घेत चौकशी केली.चौकशी अंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली.कबूली वरून त्याचे सहकारी पुन्हा २ विधीसंघर्षग्रस्त बालक व एक आरोपी नामे इब्राहिम इसराइल कुरेशी वय २० वर्षे रा.कुरखेडा यांना ताब्यात घेण्यात आले.गून्हाची कबूली देताच त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रोख ३ लाख रकमेपैकी २ लाख ८८ हजार ६९९ रुपये हस्तगत करण्यात आले व आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ कलम ३३१(३)३३१(४)३०५(अ),३(५) अन्वये गून्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधिक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेन्द्र वाघ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे,पोलीस हवालदार शेखलाल मडावी,संदेश भैसारे यांच्या टीमने केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!