Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी.. अज्ञात ट्रकची सात अल्पवयीन मुलांना धडक; चार जणांचा मृत्यू,एक जण...

मोठी बातमी.. अज्ञात ट्रकची सात अल्पवयीन मुलांना धडक; चार जणांचा मृत्यू,एक जण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी.. – काटली-साखरा मार्गावरील आज पहाटेची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गडचिरोलीहून आरमोरी मार्गे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने तब्बल सात अल्पवयीन मुलांना जोरदार धडक दिल्याने यात चार मुलांचा मृत्यू झाला,तर एक मुलगा गंभीर जखमी तर दोन मुले किरकोळ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना आज,गुरुवार ७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.अपघातात १.टिकू नामदेव भोयर वय १५ वर्षे,२.तन्वीर बालाजी मानकर वय १६ वर्षे या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.तर ३.१४ वर्षीय तुषार राजू मारबते व ४.१४ वर्षीय दूषण दुर्योधन मेश्राम यांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.क्षितिज तुळशीराम मेश्राम हा गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.आदित्य धनंजय कोहपरे यासह एक मुलगा किरकोळ जखमी असल्याने दोघांवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.वरील सातही मुले ही गडचिरोली तालुक्याच्या काटली(साखरा)येथील रहिवासी असून ते आज गुरुवार पहाटेच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील काटली वरून साखरा मार्गे कसरत(व्यायाम)करण्याकरीता गेले होते.मार्गावरून पायी चालत जात असतांनाच गडचिरोलीहून आरमोरीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने सातही अल्पवयीन मुलांना जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,टिकू व तन्वीर या दोन चिमुकल्यांचे शरीर छिन्न-विच्छिन्न झाले.सातही मुलांना धडक देऊन अज्ञात ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहेत. करीता गडचिरोली-आरमोरी व इतर मार्गावरून कसून तपासणी सुरू आहे.मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे.

नागरिकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला👇

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!