Monday, June 8, 2026
Homeगडचिरोली पुणे शहरातील सह दुय्यम निबंधक भातंबरेकर अखेर निलंबित….- करोडो रुपयांच्या मुद्रांक शुल्क...

 पुणे शहरातील सह दुय्यम निबंधक भातंबरेकर अखेर निलंबित….- करोडो रुपयांच्या मुद्रांक शुल्क महसूलाची हानी केल्या प्रकरणाचा ठपका….-  निलंबन कालावधीत राहणार गडचिरोलीत…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र.२४ या कार्यालयाला दि.१२ ऑक्टोबर,२०२३ रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे शहर) यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक,पुणे विभाग यांच्या समवेत अचानक भेट दिली होती.तसेच,सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे शहर) यांच्या कार्यालयातील तपासणी पथकामार्फत सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्र.२४ या कार्यालयामध्ये नियमित कार्यरत असलेले सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) संगर्वातील श्री.एस.पी.भातंबरेकर,यांनी माहे सप्टेंबर २०२३ व ऑक्टोबर २०२३ (दिनांक ११ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत) नोंदविलेल्या दस्तांची स्वैरपध्दतीने तपासणी सुरु करण्यात आली.

तपासणी दरम्यान सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र.२४ या कार्यालयामध्ये नियमित कार्यरत असलेले सह दुय्यम निबंधक वर्ग-२ संगर्वातील श्री.एस.पी. भातंबरेकर यांनी दि.११ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदविलेल्या दस्त क्र.२०३७०/२०२३ या खरेदीखताच्या दस्तामध्ये रु.२४,९०,१५,८००/- इतक्या मुद्रांक शुल्काची कमी आकारणी केली असल्याची बाब उक्त तपासणी पथकाला प्रथमदर्शनी निदर्शनास आली असल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी त्यांच्या संदर्भाधिन दि.१७ ऑक्टोबर,२०२३ अन्वये शासनास कळविले.

 श्री.एस.पी.भातंबरेकर, सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्र.२४ यांनी नमुद दस्त क्र. २०३७०/२०२३ या खरेदीखताच्या दस्तामध्ये यथोचित मुद्रांक शुल्काची आकारणी न करुन शासनाच्या रु.२४,९०,१५,८००/- (अक्षरी रुपये चोवीस कोटी नव्वद लाख पंधरा हजार आठशे) इतक्या मोठया प्रमाणात मुद्रांक शुल्करुपी महसूलाची हानी केली असल्याची बाब प्रथमदर्शनी निदर्शनास आली असल्याने श्री.एस.पी.भातंबरेकर यांच्या विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात आली आहे.

 श्री.एस.पी.भातंबरेकर, सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्र.२४ (सध्या कार्यरत सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,पुणे शहर यांचे कार्यालय) हे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (१) च्या खंड (अ) च्या तरतूदीनुसार दि.१९ ऑक्टोबर,२०२३ (म.नं.) पासून आणि ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहणार आहेत.

सदर आदेश अंमलात असेल तेवढया कालावधीत श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांचे मुख्यालय हे सह जिल्हा निबंधक (वर्ग- १) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली,जि.गडचिरोली येथे राहील आणि श्री.एस.पी. भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

निलंबन आदेश अस्तित्वात राहतील त्या कालावधीसाठी श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांना,महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन,बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम,१९८१ च्या नियम ६८ व नियम ६९ अन्वये निर्वाहभत्ता व त्यावरील इतर भत्ते सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,गडचिरोली, जि. गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत देय राहतील.

निलंबन कालावधीत श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ मधील तरतूदीनुसार,कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही.जर,श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा काही व्यवसाय केला तर,गैरवर्तणूकीबाबत त्यांना दोषी समजण्यात येऊन,त्याप्रमाणे त्यांचेविरुध्द कारवाई करण्यास ते पात्र होतील आणि अशा परिस्थितीत ते निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क गमावणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी,तर १२ प्रवासी किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघालेल्या  एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्समधील तब्बल १५ जण गंभीर जखमी झाले,तर १२ जण किरकोळ...

वैनगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले..

उद्रेक न्युज  भंडारा :-जिल्ह्याच्या करचखेडा येथील वैनगंगा नदी बेटावर एका खासगी बोटीद्वारे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सात तरुणांपैकी परतीच्या वाटेवर असतांना नदीतील पाण्यात बोट उलटल्याने दोन...

आता विदर्भातील हत्तींची तयार होणार स्वतंत्र ओळख नोंदवही.. – वन विभागाच्या सहकार्याने हत्तींच्या हालचालींवर राहणार वैज्ञानिक पद्धतीने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील...

नक्षलवादाच्या खात्म्यानंतर गडचिरोलीत विकासाचा नवा आराखडा.. – स्थानिक तरुणांचे कौशल्यविकास,पायाभूत सुविधा, वनहक्क आणि सेवा वितरणावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी सेवा,विकासकामे आणि जनसंपर्कातून भरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!