Friday, October 2, 2026
Homeगडचिरोलीउद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते ‘विकसित गडचिरोली जिल्हा-व्हिजन २०४७’ आराखड्यासंदर्भातील कार्यक्रमास उपस्थित राहणार असून,शालेय शिक्षण व गृह विभागाशी संबंधित विषयांचा स्वतंत्रपणे आढावा घेणार आहेत. तसेच कौशल्य विकासाशी संबंधित लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अकादमीलाही भेट देणार आहेत.
राज्यमंत्री डॉ.भोयर हे उद्या रविवारी सकाळी ११ वाजता आर.के.सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित ‘विकसित गडचिरोली जिल्हा-व्हिजन २०४७’ आराखडा तयार करण्यासंदर्भातील कार्यक्रमास उपस्थित राहतील.
त्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा ते घेणार आहेत. दुपारी १ ते २ ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.
दुपारी २ वाजता वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहातील कॉन्फरन्स हॉल येथे गृह विभागाशी संबंधित विषयांची आढावा बैठक होणार आहे.या बैठकीत जिल्ह्यातील गृह विभागाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.यानंतर दुपारी ३ वाजता राज्यमंत्री डॉ.भोयर हे धानोरा रोडवरील मौजा बोडली येथील लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमी येथे भेट देतील.दुपारी ४ वाजता पोटेगाव रोडवरील आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या संपर्क कार्यालयात भेट व चर्चा.सायंकाळी ५ वाजता ते गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार.. -सकल ओबीसी संघटनेचा इशारा; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाज सहभाग नोंदवणार नाही. ड्रॉप-डाऊन मेन्यु व स्वतंत्र काॅलम लागु करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!