Saturday, August 15, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे तिरंगा बाईक रॅली; ३०० हून अधिक पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सहभाग..

जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे तिरंगा बाईक रॅली; ३०० हून अधिक पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सहभाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात देशभक्तीचा जागर करत जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे आज शनिवारी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीचे उद्घाटन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष म्हणजे, उद्घाटनानंतर सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी स्वतः मोटरसायकलवर स्वार होत तिरंगा बाईक रॅलीत सहभाग नोंदविला.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना अधिक दृढ व्हावी,या उद्देशाने जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीच्या प्रारंभी सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी स्वतः मोटरसायकलवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला.सहपालकमंत्र्यांच्या या सहभागामुळे उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखी वाढला.या तिरंगा बाईक रॅलीत सहपालकमंत्री यांच्यासह आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश तसेच जिल्हा पोलीस दलातील सुमारे ३०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
तिरंगा हाती घेतलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलींची रांग आणि त्यात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यामुळे संपूर्ण रॅली देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेली.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता, देशाप्रती कर्तव्यभावना आणि तिरंग्याचा सन्मान यांचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यही करत असते. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या तिरंगा बाईक रॅलीत लोकप्रतिनिधी,प्रशासन आणि पोलीस दलाने एकत्रित सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून पावसाचा जोर वाढणार..

उद्रेक न्युज वृत्त :-विश्रांती घेतलेला पाऊस परत पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,आज शनिवार १५ ऑगस्ट...

जांबिया शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड उपलब्ध; वृत्तातील दाव्यांबाबत प्रशासनाचा खुलासा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील जांबिया येथील शासकीय आश्रमशाळेबाबत १४ ऑगस्ट रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड...

सर्पदंश दुर्घटनेतील दोन विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा; एका विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थिनींपैकी कविता किरंगे आणि दीपिका मडावी या दोघींच्या...

संशय आल्याने लाच रक्कम घेण्यास नकार; भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुकरमापकास एसीबीने घेतले ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शेतीचे सात-बारे वेगळे करण्यासाठी तब्बल ७५ हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजारावर सेटलमेंट झालेली असतांनाच एसीबीच्या पथकाचा संशय बळावल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!