उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत मधील रामपूर येथे डेंग्यूचा उद्रेक झाला असून तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.सोमवार अखेरपर्यंत येथे रुग्णसंख्या २२ झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
चंद्रपूर सीमेवरील गोंडपिंप्रीजवळ रामपूर हे गाव आहे. येथे २२ मे रोजी डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी रुग्ण आढळून आले. २५ मे अखेरपर्यंत ११ रुग्ण निष्पन्न झाले.२७ मे अखेर ही संख्या २२ वर जाऊन पोहोचली. १३ रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात,८ रुग्णांवर चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून एक रुग्ण घरीच आहे.दरम्यान, आरोग्य विभागाने आतापर्यंत गावातील सुमारे शंभर लोकांचे रक्तनमुने तपासणी घेतले आहेत. बहुतांश रुग्ण ते वयाची साठी पार केलेले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंप्रीला चिकटून रामपूर आहे.तेथून डेंग्यूची साथ पसरल्याचा अंदाज आहे.

