Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूरमृत अर्भक सापडल्याने शहरात खळबळ..! - अर्भकाचे निर्दयी माता-पिता कोण?

मृत अर्भक सापडल्याने शहरात खळबळ..! – अर्भकाचे निर्दयी माता-पिता कोण?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर शहरात एका मृत अर्भकाचे शव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही काल शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.चिमूर शहराच्या पिंपळनेरी रोड पोलीस स्टेशन समोरील झुडपात मोकाट कुत्रे एका मृत अर्भकाला खातांना  दुचाकीवरून जाणाऱ्या चिमूर पोलीस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी मयुरी कोराम यांना दिसून आले.त्यानुसार त्यांनी याबाबत नागरिकांना सोबत घेऊन मोकाट कुत्र्यांना पळवून लावले.सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.याबाबत चिमूर पोलीस प्रशासनास माहिती होताच घटनास्थळ गाठून चंद्रपूर येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता तपास अंती मृत अर्भकास शहरातील जुना वडाळा रस्त्यावरील नळ योजनेच्या एका खड्ड्यात गाळण्याची योजना होती.पोलिसांनी लगेच त्या अर्भकाला ताब्यात घेतले. अर्भकाचा पाय व छाती खालील भाग मोकाट कुत्र्यांनी  खाल्ला असून तोंड व पाय कायम असल्याचे दिसून आले.सदर अर्भक ८ ते ९ महिन्याचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.सदर अर्भक कुणी टाकला व त्या अर्भकाचे निर्दयी माता-पिता कोण? याचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!