Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीइंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित ‘इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि ‘वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होऊन आपली कौशल्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची संधी साधावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
देशातील विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट प्रतिभा शोधून त्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.जिल्हा स्तरावरून निवड झालेल्या स्पर्धकांना राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळणार असून,राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्पर्धकांना WorldSkills Competition मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय साधारणतः १६ ते २२ वर्षे असावे.काही कौशल्य प्रकारांसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आहे.भारतातील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी तसेच संबंधित क्षेत्रात कौशल्य व आवड असलेले युवक-युवती या स्पर्धेसाठी पात्र आहेत.
इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर किंवा Skill India Digital (SID) पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी.नोंदणी प्रक्रियेमध्ये आधार प्रमाणीकरण,वैयक्तिक माहिती,पत्ता,शैक्षणिक तपशील भरून संबंधित कौशल्य श्रेणीची निवड करावी लागेल.या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना जिल्हा,राज्य,विभागीय,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्रे,पारितोषिके तसेच कौशल्य क्षेत्रात पुढील प्रगतीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली येथे तर इतर जिल्ह्यातील इच्छुकांनी जिल्हा स्तरावर संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!