Monday, September 7, 2026
Homeचंद्रपूरचीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

चीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे.परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असलेल्या एका ४ वर्षीय चीमुकलिशी ७५ वर्षीय वृद्धाने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.वासुदेव नथ्युजी बागडे वय ७५ वर्षे असे आरोपी वृद्धाचे नाव असून पीडित चिमुकलीचे आई-वडील संबंधित परिसरात किरायाच्या घरात वास्तव्यास आहेत. त्यातच आरोपी वासुदेव बागडे त्याच परिसरात राहतो. घटनेच्या दिवशी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पीडित मुलगी परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असतांना आरोपी वासुदेव बागडे याने चार वर्षीय चिमुकलीशी अश्लील वर्तन केले.त्यामुळे घाबरलेल्या चिमुकलीने घरी परतून घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.सदरचा धक्कादायक प्रकार समोर येताच पालकांनी तातडीने भद्रावती पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वासुदेव बागडे याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!