Friday, July 10, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट क्रमांक-२१ मध्ये घडली.अनिल भास्कर दिवटे वय ३० वर्षे,रा.बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून तो काल गुरुवारी जंगल परिसरात रानभाजी तोडत असतांना सदरची घटना घडली.
पाऊस पडताच जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांना पालवी फुटत असते.अशातच बाजारपेठेत विक्रीसाठी तसेच रानभाजी खाणारे शौकीन जंगल परिसरात जाऊन रानभाजी तोडून वर्षातून एकदा तरी त्याचा आस्वाद घेत असतात.अश्याच प्रकारे अनिल दिवटे हे पद्मापूर चक जंगल परिसरालगत रानभाजी गोळा करण्यासाठी गेले होते.दुपारच्या सुमारास भाजी तोडत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला.यातच अनिल दिवटे मृत पावले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान,या घटनेनंतर वनविभागाने संबंधित परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि लाइव्ह कॅमेरे बसवले. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत.. – शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतमालाचे मूल्यवर्धन,सुरक्षित साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'कृषी पायाभूत सुविधा निधी' योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य...

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!