Wednesday, September 30, 2026
Homeचंद्रपूर३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार..!

३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या चोरगाव परिसरात उघडकीस आली.कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत असतांना ही घटना घडली.संजय माधवराव सिडाम वय ३१ वर्षे, रा.केळझर,ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे मृतक तरुणाचे नाव आहे.
केळझर येथील रहिवासी असलेले संजय सिडाम यांची सासुरवाडी चंद्रपूर तालुक्याच्या चोरगावची आहे.ते काही दिवसांपासून सासुरवाडीत वास्तव्यास होते. त्यांनी चार दिवसांपूर्वीच शेतात कपाशीची लागवड केली होती. विशेष म्हणजे,चोरगाव हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ म्हणजेच ताडोबा बफर झोनच्या सीमेला लागून आहे व याच जंगल परिसरात शेती असल्याने काल रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संजय हा पत्नी,सासू आणि सासऱ्यासह शेतावर गेला होता.दरम्यान, वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती सौरऊर्जेवर चालणारे बॅटरीचे कुंपण लावण्याचे काम सुरू होते.कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत असतांना जंगल परिसरातून मार्गक्रमण आलेल्या वाघाने अचानकपणे संजयवर पाठीमागून झडप घातली.सदरचे दृश्य पाहून जवळच असलेल्या सासऱ्याची भंबेरी उडाली.तरीही त्यांनी जिवाची पर्वा न करता हातात काठी घेतली आणि वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण,तोपर्यंत खूप उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच वन विभाग पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पुढील प्रक्रिया पार पाडली.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघांच्या हल्ल्यात आणखी कितीजण जीव गमावणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!