Friday, August 14, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज रेल्वे बोगदा मार्गावरील वाहतूक आणखी ११ दिवस राहणार बंद..

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्गावरील वाहतूक आणखी ११ दिवस राहणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९(रेल्वे बोगदा अंडरपास)येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीवरील निर्बंधांची मुदत १० जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.यापूर्वी या मार्गावरील वाहतूक बुधवार १० जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली होती.
पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडून पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे.कामाची गुणवत्ता व मजबुती सुनिश्चित करण्यासाठी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंत्यांनी मुदतवाढ मागितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार २ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत अंडरपासच्या दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.मात्र,प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा,महावितरण,दूरसंचार आणि रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवांची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
मोटार वाहन कायदा,१९८८ मधील कलम ११५ व ११६ चे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!