Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजबुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या.. - देसाईगंज...

बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या.. – देसाईगंज सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जागतिक कीर्तीच्या बुद्धगया येथील बौद्ध विहारावर हिंदु मठाधिपतींचे वर्चस्व आहे. त्यामुळे बौद्ध संस्कृतीला बाधा निर्माण होत आहे. त्यासाठी देशातील तमाम बौद्ध बांधव तसेच भिक्खुंनी या विरोधात लढा उभारला असुन या लढ्यास पाठिंबा दर्शविण्यासाठी देसाईगंज सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या वतीने आज,सोमवारी देशाच्या राष्ट्रपतींना देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फतिने निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन सादर करतांना सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर म्हणाल्या की,  जागतिक किर्तिचे बौद्ध धम्माचे प्रचार,प्रसार करण्याचे धम्मपिठ असलेल्या महाबोधी बुद्धविहार बुद्धगया येथील विहार ही बौद्ध संस्कार निर्मितीचे जागतिक धम्मपिठ असुन या ठिकाणी जगभरातील बौद्ध अनुयायी येतात.या बौद्ध विहारात हिंदु मठाधिपतींनी आपले बस्तान मांडल्याने यामुळे बौद्ध संस्कृतीला अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे या विरोधात देशातील तमाम बौद्ध भिक्खुंनी मोठे आंदोलन उभे केले आहे.या आंदोलनाला पाठिंबा दर्शवुन बौद्ध विहार मठाधिपतींच्या ताब्यातुन मुक्त करावे,अशी मागणी बौद्ध अनुयांच्या वतीने सर्वत्र करण्यात येत असल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले.
निवेदन सादर करतांना समितीच्या अध्यक्षा कविता मेश्राम,नलिता वालदे,यशोधरा मेश्राम,सरिता बारसागडे,सुनिता नंदागवळी,ममता कऱ्हाडे,लिना पाटील,प्रतिमा शेन्डे, प्रतिभा बोदेले,मारोती जांभुळकर,राजरतन मेश्राम,शिशुपाल वालदे,भिमराव शेन्डे,विद्यानंद मेश्राम,पवन गेडाम,संजय मेश्राम,आशिष घुटके,दिलिप शेन्डे,अभिमन्यु बन्सोड,प्रल्हाद लाडे,समर्थ सहारे,पुरुषोत्तम भैसारे,प्रकाश बारसागडे,मंगेश भैसारे,मोहन घायवान,शिवाजी मेश्राम,प्रविण रामटेके यांचेसह शेकडो बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!