Thursday, July 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततुंबळ चकमकीत जहाल महिला नक्षलीस कंठस्नान..!

तुंबळ चकमकीत जहाल महिला नक्षलीस कंठस्नान..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या काँकेर जिल्ह्यातील माचपल्लीच्या जंगलात आज,सोमवार १३ एप्रिल रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत जहाल महिला नक्षलीस कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलास मोठे यश मिळाले आहे.चकमकीत रंगाबोईना भाग्या उर्फ रुपी रेड्डी असे ठार झालेल्या महिला नक्षलीचे नाव असून शासनाने तिच्यावर तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.ती मूळची तेलंगणा राज्याची रहिवासी होती आणि २००४ पासून नक्षल चळवळीत सहभागी झाली.छत्तीसगडमधील माड डिव्हीजनची विभागीय समितीची सदस्य होती.त्याचबरोबर उत्तर बस्तर क्षेत्रातील परतापूर क्षेत्रिय समिती सदस्य(एसीएम) होती.छत्तीसगडमध्ये कार्यरत तेलंगणा कॅडरची ती अखेरची नक्षलवादी होती.छत्तीसगड राज्यातील जहाल नक्षलवादी तथा स्पेशल झोनल कमिटी मेंबर सुगुलुरी चिन्नाना उर्फ विजय रेड्डी याची रुपी ही पत्नी होती.१३ ऑगस्ट २०२५ रोजी छत्तीसगडच्या मोहल्ला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत विजय रेड्डी ठार झाला होता.त्यानंतरही रुपी ही नक्षल दलममध्ये सक्रिय होती.रुपी रेड्डी ही आत्मसमर्पण करण्यास तयार नव्हती.अश्यातच आज तिचा खात्मा करण्यात आला. काँकेर जिल्ह्याच्या छोटेबेठिया पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माचपल्लीच्या जंगल परिसरात काही नक्षली सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलास मिळताच  नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली होती.अभियान राबवित असतांनाच सुरक्षा दल
आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली.सुरक्षा दलांचा वाढता दबाव पाहून घटनास्थळावरून काही नक्षलवादी पसार झाले.दरम्यान,सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली असता एका महिला नक्षलीचा मृतदेह आणि काही शस्त्रे सापडली.मृत नक्षली ही रंगाबोईना भाग्या उर्फ रुपी रेड्डी असल्याचे स्पष्ट झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!