Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरबैल,गाय व गोऱ्यांची अमानुष वाहतूक; ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

बैल,गाय व गोऱ्यांची अमानुष वाहतूक; ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतूक उघड केली.नाकाबंदी दरम्यान दोन ट्रक पकडले व त्यातून ५२ जनावरांची सुटका करण्यात आली असून सुमारे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काल बुधवारी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोयगाव मार्गावर विशेष नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान संशयित ट्रक क्रमांक-सीजी ०४ पी क्यू ७५७९ तसेच दुसरे जडवाहन अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही ट्रकमध्ये एकूण ५२ गोवंशीय जनावरे(बैल,गाय व गोरे)अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.यामध्ये तीन जनावरे मृत अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.या प्रकरणी आरोपी सादिक कुरेशी रा.गडचांदूर,जि.चंद्रपूर तसेच दोन्ही ट्रकचे चालक यांच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींवर प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत पोलिसांनी ५२ गोवंशीय जनावरे तसेच दोन ट्रक असा एकूण अंदाजे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सर्वेश बेलसरे तसेच स्वामीदास चालेकर,अजय बागेसर,किशोर वैरागडे,प्रमोद डंभारे,गोपीनाथ नरोटे व वृषभ बारसिंगे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!