Thursday, July 9, 2026
Homeचंद्रपूरनराधम बापाचा आपल्याच मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत..

नराधम बापाचा आपल्याच मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका ३७ वर्षीय नराधम बापाने आपल्याच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यात उघडकीस आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून घटनेचा सर्वच स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे व दोषीवर कठोरात-कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.आरोपी वडिल दारूच्या आहारी गेल्याने घरी सततची किरकिरी करून नेहमी वाद घालायचा.यामुळे मुलीची आई कंटाळली होती. नवऱ्याच्या त्रासापायी तीन महिन्यांपूर्वी मुलगा व मुलगी यांना घेऊन राजुरा येथे माहेरी गेली होती.मात्र, मुलीची परीक्षा असल्याने वडिलाने तिला गावी आणले आणि मुलीवर अत्याचार केला.दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार ८ एप्रिल २०२६ रोजी शाळेत परीक्षा देण्यासाठी गेलेल्या मुलीच्या बॅगेत कपडे आढळल्याने शिक्षकांना संशय आला.त्यांनी चौकशी केली असता मुलगी भावनिक होऊन रडू लागली आणि तिने घडलेला सर्व प्रकार शिक्षकांना सांगितला.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षकांनी तात्काळ गावातील पोलिस पाटील यांना माहिती दिली.त्यानंतर,पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.पोलिसांनी शाळेत जाऊन मुलीची सविस्तर चौकशी केली व तिच्या जबाबाच्या आधारे तातडीने कारवाई केली.पीडित मुलीची चंद्रपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालानंतर आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक करून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!