Sunday, May 31, 2026
Homeभंडाराबापरे..! चार चिड्डूक पोरं अन् तीन तरणेबांड पोरांनी फोडली तब्बल ३२ दुकाने..

बापरे..! चार चिड्डूक पोरं अन् तीन तरणेबांड पोरांनी फोडली तब्बल ३२ दुकाने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चोरीचा सपाटा चावलेल्या टोळीचा छडा लावण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे.चोरीच्या छड्यातील विशेष बाब म्हणजे, चार चिड्डूक पोरं अन् तीन तरणेबांड पोरांनी भंडारा शहर, भंडारा जवाहरनगर आणि तुमसर शहरात तसेच रात्रीच्या सुमारास नागपुरातील यशोदानगर, बर्डी आणि मौदा या ठिकाणी लागोपाठ तब्बल ३२ दुकाने फोडून चोरी करण्याचा सपाटा सुरू केला होता.८ व ९ एप्रिलच्या रात्री जवाहरनगर आणि भंडारा तसेच तुमसर पोलिसांच्या हद्दीत एकाच रात्री चोरीच्या घटना घडल्या होत्या.पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,प्रॉपर्टी पथकातील सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करून आरोपींचा शोध घेतला. नागपुरातील बर्डी आणि यशोदानगर या भागात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये एका युवतीचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे.ती या आरोपींची गर्लफ्रेंड असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिचाही चेहरा पुढे आला आहे. पोलिस तिच्या शोधात आहेत.आरोपी नागपुरातील रहिवासी असल्याचे लक्षात आल्यावर सतत दोन दिवस पाठलाग करून आणि वाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल जाधव यांच्या सहकार्याने तपास करून टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यातील चार अल्पवयीन आहेत.तर,दोघेजण फरार असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.टोळीविरुद्ध ठिकठिकाणी दाखल झालेल्या प्रकरणात सुमारे एक लाख ५० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या चोरीची नोंद असून आतापर्यंत पोलिसांनी ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका दुचाकीसह दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा समावेश आहे.सम्यक उत्तम वाटोडे वय १८ वर्षे, आंबेडकर नगर,वाडी,नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव असून अन्य चार अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.तर,संतोष ऊर्फ कालू नागदेवे व चिंटू उईके अशी फरार आरोपींची नावे आहेत.भंडारा, जवाहरनगर आणि तुमसर पोलिसात त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३),३३१(४),३०५ (अ),(३),(४)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!