Wednesday, July 15, 2026
Homeगोंदियाघराजवळ खेळत असतांना वाघाचा हल्ला; चिमुकल्याचा मृत्यू..

घराजवळ खेळत असतांना वाघाचा हल्ला; चिमुकल्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-चंद्रपूर,नागपूर,भंडारा व आता गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात वाघाची डरकाळी अन् मनुष्याचा जीव घेण्याच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारे काल शुक्रवारच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकल्याला वाघाने ठार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात उघडकीस आली आहे.प्रज्वल गोवर्धन मेश्राम वय ६ वर्षे,रा.आदर्श धाबेटेकडी,ता.अर्जुनी-मोरगाव,जि.गोंदिया असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत चिमुकल्याचे नाव असून तो घराजवळ खेळत होता.खेळत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे प्रज्वलवर हल्ला चढवला आणि जंगलाच्या दिशेने ओढत नेले.दरम्यान,सदरचे दृश्य कुटुंबियांच्या नजरेस पडताच त्यांनी आरडाओरड केली. लागलीच ग्रामस्थांनीही जोरजोराने ओरडायला सुरुवात केल्याने वाघाने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.त्यानंतर,ग्रामस्थांनी एकत्र येत तात्काळ शोधमोहीम सुरू केली.काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र,तो पर्यंत चिमुकल्याने प्राण सोडला होता.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने कुटूंबीय शोकसागरात बुडाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!