Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरनाचतांना धक्काबुक्की; एकाची हत्या तर एकजण जखमी..

नाचतांना धक्काबुक्की; एकाची हत्या तर एकजण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सर्वत्र धूमधडाक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात असतांनाच चंद्रपूर शहरात जयंती दिनीच गालबोट लागल्याची घटना उघडकीस आली आहे.मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.तर एकजण जखमी झाल्याची घटना काल,मंगळवार १४ एप्रिलच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहराच्या गांधी चौकात घडली.रविकांत टेम्बुलकर वय ३६ वर्षे असे मृत तरुणाचे नाव असून तो शहरातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्यास होता.या घटनेत अनिकेत गलबले हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चंद्रपूर शहरात सकाळपासून विविध विहारातून तसेच प्रभागातून भव्य रॅली काढण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला.अभिवादन करून ही रॅली वॉर्डात निघून जात होती.जयंती दिनी बाबासाहेबाना मानवंदना देण्यासाठी हजारो अनुयायी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.डिजेच्या तालावर या रॅली विविध भागातून येत होत्या. रात्री साडे अकरा वाजता इंदिरानगर मधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था तर्फे गांधी चौकात रॅली पोहोचल्यावर डीजेच्या तालावर नाचतांना तरुणांमध्ये धक्काबुक्की झाली.यात काही तरुण चवताळले आणि त्यांनी वाद घालत काही तरुणांना मारहाण केली.तेवढ्यात वाद सोडवण्यासाठी रविकांत टेम्बुरकर हा धावून समोर गेला.त्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता काही तरुणांनी रविकांतवर चाकूने सपासप वार केले.उपस्थित नागरिकांनी रविकांतला जखमी अवस्थेत उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले.पण,तिथेच त्याचा मृत्यू झाला.प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!