Tuesday, July 21, 2026
Homeपुणेचारित्र्याच्या संशयावरून नव्हे तर प्रियकरासाठी पतीचा खून; हत्या प्रकरणाला नवे वळण..!

चारित्र्याच्या संशयावरून नव्हे तर प्रियकरासाठी पतीचा खून; हत्या प्रकरणाला नवे वळण..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवार २४ ऑक्टोंबरच्या पहाटे धक्कादायक घटना उघडकीस आली होती.सुरुवातीला पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनेच पतीचा काटा काढून गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले होते.प्रकरणी २८ वर्षीय आरोपी पत्नीस चिंचवड पोलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.चैताली नकुल भोईर वय २८ वर्षे,रा.भोईर कॉलनी,चिंचवड असे आरोपी पत्नीचे नाव असून नकुल आनंद भोईर वय ४० वर्षे असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.नकुल भोईर हे सामाजिक कार्यकर्ते होते.सदरची घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास माणिक कॉलनीतील महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाच्या इमारतीत घडली होती.आरोपी पत्नीने पतीची स्वतःच हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले होते.मात्र,पोलिसांनी संशय व्यक्त करून तपास सुरू केला होता.त्यानुसार,पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे.आरोपी पत्नी चैताली भोईरने तिच्या २१ वर्षीय प्रियकराच्या मदतीनेच पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी प्रियकर सिद्धार्थ पवारला अटक करून दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपी चैताली मद्यपान करायची.नकुल हे पत्नीला मद्यपान करण्यास मनाई करून काही मित्रमैत्रिणींपासून दूर राहण्यास सांगायचे.त्यातच चैतालीचा सिद्धार्थ पवार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.नकुल भोईर यांना दोघांच्या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.तरुणाच्या संबंधामुळे दाम्पत्यामध्ये तणाव वाढत गेला.घटनेच्या दिवशी नकुल भोईर यांनी पत्नी चैतालीला मारहाण केली होती.मारहाण केल्याची माहिती तिचा प्रियकर सिद्धार्थ पवारला कळली.सततच्या वादांना कंटाळून चैतालीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. शुक्रवारच्या रात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान दोघांनी एकत्र येऊन नकुल यांचा कपड्याने गळा आवळून खून केला.सुरुवातीला पोलिसांना ही कौटुंबिक वादातून घडलेली घटना असल्याचा संशय होता.चौकशीत पत्नी चैताली भोईर हिने स्वतःच गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.मात्र,तपास जसजसा पुढे सरकला,तसतसे या हत्येमागे आणखी एक व्यक्ती असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि भांडाफोड झाला. त्यानुसार,सिद्धार्थ आणि चैतालीच्या  मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!